नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. केजरीवालांनी सत्येंद्र जैन यांचे वर्णन “शूर माणूस” आणि “हीरो” म्हणून केले. गेल्या वर्षी मे महिन्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यापासून तिहार तुरुंगात बंद असलेल्या जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव गेल्या शुक्रवारी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.