कोची: संयुक्त अरब अमिरातीतील करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी 105 जणांचे वैद्यकीय पथक तिकडे रवाना करण्यात आले आहे. हे पथक आज बुधवारी तिकडे रवाना झाले. त्यात परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोचिनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या पथकाला विशेष विमानाने अबुधाबीकडे रवाना करण्यात आले. अमिरातीतील करोनाग्रस्तांच्या रूग्णालयांमध्ये हे पथक मदतीसाठी तैनात केले जाणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह तसेच आरोग्य मंत्रालयांमध्ये झालेल्या चर्चेनुसार हे पथक तिकडे पाठवले गेले आहे.
Read More राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध
त्यासाठी अमिरातीकडून भारताल विनंती करण्यात आली होती. आम्ही एक आव्हान म्हणून ही जबाबदारी स्वीकारली असून यात आम्ही सर्वंकष योगदान देऊ असे या पथकातील कर्मचाऱ्यांनी तिकडे रवाना होण्यापूर्वी सांगितले. या मोहीमेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी त्यांचे आभार मानले.