21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार : केसरकर

शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार : केसरकर

एकमत ऑनलाईन

पणजी : शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष नेतेपदावरुन हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. पण शिवसेनेच्या या कृतीवर शिंदे गटाने आक्षेप घेतला असून याला कोर्टात आव्हान दिले जाईल असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

केसरकर म्हणाले, शिवसेना पक्षाच्यावतीनं असं सांगण्यात आले आहे की, पक्षनेते पदावरुन एकनाथ शिंदे यांना काढण्यात आलं आहे. यासाठी जे पत्र किंवा नोटीस शिंदेंना देण्यात आली आहे, ती आक्षेप घेण्याजोगी असून त्याचं रितसर उत्तर आधी आम्ही पाठवू त्यानंतर या कारवाईत बदल झाला नाही तर त्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू.

ज्यावेळी शिंदे मुख्मयंत्री झाले तेव्हा ते आपोआपचं सभागृह नेते झाले आहेत. हे पद वैधानिक पद आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रशासनाचे मुख्य असता. पण सभागृहाचे नेते हे सर्वोच्च पद आहे. कुठलाही आमदार विधानसभा सभागृहात भाषण करत असेल, कुठलंही कामकाज चालू असेल आणि त्याचवेळी जर सभागृह नेते आपल्या दालनात निघून गेले तर ते कामकाज ताबडतोब थांबवावे लागते. जोपर्यंत सभागृहाचे नेते तिथे स्थानबद्द होत नाही, तोपर्यंत पुढचे कामकाज चालत नाही. एवढं या पदाला महत्व आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या