22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकेतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

मुुंबई : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणं चांगलंच महागात पडलंय. केतकीने केलेली सोशल मीडिया पोस्ट तिला थेट तुरुंगवारीसाठी घेऊन गेली. ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केतकीला ताब्यात घेतलं. यानंतर तिला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर आज कोर्टात हजर केल्यानंतर केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि आपत्तीजनक शब्दात पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कोठडी मध्ये असण-या अभिनेत्री केतकी चितळे यांना आज ठाणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. याआधी केतकीने न्यायालयात पोस्ट डिलीट करणार नसल्याचे सांगितले होतं. मागील पाच दिवसात केतकीवर राज्यभरात १४ गुन्हे दाखल झाले आहेत.

यामध्ये कळवा, अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मनाबादचा समावेश आहे. सध्या ठाणे पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत ताब्यात घेतलंय. मात्र, आता मुंबई पोलीस केतकीची कस्टडी मागू शकतात. त्यामुळे पुनहा पोलीस कोठडी आणि चौकशीचा ससेमिरा तिच्या मागे लागण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या