19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयहिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे

एकमत ऑनलाईन

धर्मशाळा : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी झेंडे लावण्यात आल्याची घटना घडली आहे. विधानसभेच्या बाहेर हे झेंडे लावलेले आढळून आले असून त्याच्यावर खलिस्तान असे नाव लिहिलेले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी तात्काळ झेंडे उतरवले असून स्थानिक लोकांनी हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास आणि चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हिमाचलप्रदेशमधील धर्मशाळा येथील तपोवन येथे असलेल्या या विधानसभा भवनाच्या गेटवर हे झेंडे लावण्यात आले आहेत. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून झेंडे काढले आहेत आणि स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे. कांगडा येथील एसपी खुशाल शर्मा यांनी सांगितले की, हे झेंडे साधारण पहाटेच्या दरम्यान लावले असावेत. पंजाबमधून आलेल्या पर्यटकांनी सुद्धा हे कृत्य केले असेल त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत.

मुख्यमंत्री ठाकूर यांच्याकडून निषेध व्यक्त
राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या विधानसभा भवनामध्ये फक्त हिवाळी अधिवेशन होत असतात त्यामुळे या ठिकाणी फक्त अधिवेशनावेळी जास्त सुरक्षा ठेवली जाते असे सांगत झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या