23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रखोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा जाहीर ; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा जाहीर ; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

एकमत ऑनलाईन

जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. खोतकर शिंदेंना पाठिंबा देणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.
पत्रकार परिषदेत खोतकर म्हणाले, आज सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझे सविस्तर बोलणे झाले.

माझ्यावर ओढवलेली परिस्थिती मी पक्षप्रमुखांना सांगितली. त्यानंतर मी संजय राऊतांशी बोललो. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. मी ४० वर्षांचा सच्चा शिवसैनिक आहे. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणे गरजेचे आहे, असे सांगताना मी उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली. त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना आपल्या सहका-यांना सुरक्षित करणे गरजेचे आहे. मला असे निश्चित वाटते की, त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी मला सुरक्षित केले असेल. उद्धव ठाकरे मला म्हणाले की, तुम्ही अडचणीत असाल तर निर्णय घेऊ शकता. माझ्यासमोर अडचण कोणी निर्माण केली हे सांगायची गरज नाही. हे सर्वांना माहिती आहे, असेही खोतकर म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या