21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकिम जोंग यांनी घेतला दक्षिण कोरियाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय

किम जोंग यांनी घेतला दक्षिण कोरियाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय

एकमत ऑनलाईन

सेऊल : उत्तर आणि दक्षिण कोरियात राजकीय वातावरण चिघळले आहे.करण किम जोंग उन यांच्या बहिणीने उत्तर कोरियामधून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून यापूर्वी दक्षिण कोरियाला सैन्य करार आणि इतर संबंध संपुष्टात आणण्याचा इशारा दिला होता. उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून काही फुगे सोडतात. तसेच त्यात किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात काही संदेशही लिहिलेले असतात, अशी माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या किम जोंग यांनी दक्षिण कोरियाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने याविषयी माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाला अशी कृत्य करणाऱ्या लोकांना थांबवण्यात अपयश आल्याचे सांगत उत्तर कोरियाने सैन्य आणि राजकीय करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या अहवालात म्हटले आहे की, मंगळवारी पहिले पाऊल म्हणून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करणार आहे. तसेच उत्तर कोरियातील नागरिक दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांच्या विश्वासघातकी व्यवहारामुळे नाराज आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे, सांगण्यात आले आहे.

अहवालात दक्षिण कोरियावर काही आरोपही करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या काही अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेतृत्वाची (किम जोंग उन) प्रतीमा मलिन केली आहे. तसेच आता समोरसमोरील बैठकीची गरज नाही, असे संकेतही देण्यात आले होते, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दक्षिण कोरियातून असे फुगे उडवणाऱ्यांना थांबवण्यासाठी उत्तर कोरियाने अनेकदा पोलिसांद्वारे कारवाई केली होती. पण यावर बंदीची उत्तर कोरियाची मागणी मात्र फेटाळण्यात आली होती. हा प्रकार म्हणजे आपल्या सरकारवरील हल्ला असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

Read More  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेणार? उद्धव ठाकरेंनी बोलवली मंत्रिमंडळ बैठक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या