23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयनाईक देवेंद्र प्रतापसिंग यांना कीर्तीचक्र

नाईक देवेंद्र प्रतापसिंग यांना कीर्तीचक्र

एकमत ऑनलाईन

८ जवानांना शौर्यचक्र, श्वान अ‍ॅक्सेसला शौर्य पुरस्कार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. या स्वातंत्र्यदिनी नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांना कीर्ती चक्र हा देशातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाईक देवेंद्र प्रतापसिंग या वर्षी २९ जानेवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या ऑपरेशनचा भाग होते, तिथे त्यांनी आपले शौर्य दाखवले आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले.

याशिवाय लष्करातील ८ जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. यापैकी शिपाई करण वीर सिंग, गनर जसबीर सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये मेजर नितीन धानिया, अमित दहिया, संदीप कुमार, अभिषेक सिंग, हवालदार घनश्याम आणि लान्स नाईक राघवेंद्र सिंग यांचा समावेश आहे.

श्वान अ‍ॅक्सेलला शौर्य पुरस्कार
भारतीय लष्कराच्या अ‍ॅक्सेल (बेल्जियन मालिनॉइस डॉग) या लढावू श्वानाला मरणोत्तर मेन्शन इन डिस्पॅच हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवाईत श्वानाच्या भूमिकेसाठी गेल्या महिन्यात हा पुरस्कार देण्यात आला होता. ३१ जुलै रोजी बारामुल्लाच्या वानीगाम येथे जेव्हा भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. त्यात श्वानपथकाचाही त्यात समावेश करण्यात आला. श्वान अ‍ॅक्सेलच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवण्यात आला होता. जेणेकरुन त्याने केलेल्या कक्षातील हस्तक्षेपादरम्यान दहशतवाद्यांची अचूक माहिती लष्करापर्यंत पोहोचू शकेल आणि ते सहजपणे ऑपरेशन करू शकतील.

चकमकीच्या ठिकाणी अ‍ॅक्सेल घरात घुसताच दहशतवाद्यांनी त्यावर गोळीबार केला. तीन गोळ््या लागल्याने त्याला जीव गमवावा लागला. लष्कराच्या एका अधिका-याने सांगितले की, हल्ला करणा-या श्वानाला विशेष प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून तो संशयिताला पकडू शकेल.

महाराष्ट्रातील दोघांना शौर्यचक्र
मर्दीनटोलाच्या चकमकीत जहाल माओवादी मिलींद तेलतुंबडेसह तब्बल ३६ माओवाद्यांना ठार मारण्याच्या शौर्याबद्दल गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह तिघांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. गेल्यावर्षी मर्दीनटोलाच्या चकमकीत तब्बल ३६ माओवादी ठार झाले होते. विशेष म्हणजे सैन्य दलासाठी असलेले शौर्यचक्र पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलासाठी जाहीर झाले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या