24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeरेल्वे पुन्हा देतंय नोकरीची संधी, नाही द्यावी लागणार लेखी परिक्षा, जाणून घ्या

रेल्वे पुन्हा देतंय नोकरीची संधी, नाही द्यावी लागणार लेखी परिक्षा, जाणून घ्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व रेल्वेने हावडा विभागातील ऑर्थोपेडिक रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी आणि नर्सिंग सहाय्यक (कर्मचारी परिचारिका) यांच्या 50 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पूर्व रेल्वेद्वारा व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिफोनद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे.

पदांची नावे-

कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर आणि नर्सिंग सुपरिटेंडंट (स्टाफ नर्स) ची पदे

पदांची संख्या – एकूण 50 पदे

शैक्षणिक पात्रता-

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ठरविण्यात आली आहे. यासाठी अर्जदाराने अधिसूचना वाचावी.

वयोमर्यादा-

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा पूर्व रेल्वेच्या नियमांनुसार निश्चित केली गेली आहे.

महत्त्वाची तारीख-

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2020

मुलाखतीची तारीख: 2 जून 2020

अर्ज कसा करावा-

सर्व प्रथम इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना डाउनलोड करून वाचावी. सर्व माहिती जाणून घ्यावी आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे. अर्जदारांनी 31 मे 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी असल्यास अर्ज अवैध ठरवला जाईल. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच अर्ज करावा.

निवड प्रक्रिया-

मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या