कोल्हापूर : कोल्हापूरच्या गिर्यारोहक कस्तुरी दिपक सावेकर हिने शनिवार दि. १४ मे रोजी सकाळी सहा वाजता जगातील सर्वात उंच समजले जाणारे ८ हजार ८४८. ८६ मीटर उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करीत देशाचा तिरंगा फडकाविला. हे यश तिने राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केले.
कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. त्यामुळे ही मोहीम तिला अर्धवट सोडावी लागली होती. मात्र तिने हताश न होता आपले प्रयत्न सुरु ठेवले. नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने अनेक शिखरे पादाक्रांत केली. मागील वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढण्यास अपयश आल्यानंतर कस्तुरी पुन्हा २४ मार्च २०२२ ला एव्हरेस्ट चढाईसाठी रवाना झाली. या मोहिमेचा एक भाग म्हणून सरावादरम्यान २८ एप्रिल २०२२ दरम्यान अष्टहजारी समजले जाणारे अन्नपुर्णा-१ हे २६ हजार ५४५ फुटावरील अंत्यत खडतर समजले जाणारे हेशिखर तिने सर केले. हे शिखर सर करणारी ती कमी वयात सर करणारी जगातील सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली.
——————