25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रऋतुजा यांनी आपल्या पतीप्रमाणे जनतेची कामे करावीत; कोंदिराम लटकेंचा सुनेला सल्ला

ऋतुजा यांनी आपल्या पतीप्रमाणे जनतेची कामे करावीत; कोंदिराम लटकेंचा सुनेला सल्ला

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऋतुजा लटके यांनी आपल्या पतीप्रमाणे जनतेची कामे करावीत, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया कोंदिराम लटके यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्या सुनेला मोलाचा सल्लाही दिला आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित होत असताना त्यांचे सासरे व दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके म्हणाले की, जनतेने विश्वास ठेवल्याने ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. आपल्या पतीने केलेल्या कामाप्रमाणे त्यांनीही जनतेची कामे व्यवस्थितपणे करावीत. जनतेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. त्यांनी लोकांच्या घरी जाऊन मदत करावी, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. कुणी आजारी असेल तर त्यांना रुग्णालयात जाऊन धीर द्यावा, असा सल्ला त्यांनी आपल्या सुनेला दिला आहे.

‘‘रमेश लटकेंनी लोकांसाठी कामे केल्याने त्यांनी ऋतुजा लटके यांच्यावरही विश्वास टाकला आहे. त्यांनीही लोकांचा विश्वास सार्थ ठरवावा आणि लोकांची कामे करावीत’’ असेही ते पुढे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या