लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने देशद्रोह कायद्याला असंवैधानिक ठरवले आहे. लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना लाहोर हायकोर्टाने म्हटले आहे कि, राजकीय हेतूंसाठी देशद्रोह कायद्याचा वापर केला जात आहे. हायकोर्टाने कलम १२४ ए असंवैधानिक ठरवले आहे.
सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी देशद्रोह कायद्याच्या कलम १२४ ए चा बचाव केला, परंतु याचिकाकर्त्याची बाजू अशी होती की, देशद्रोह कायदा १८६० मध्ये ब्रिटीश काळात बनला होता. ‘देशद्रोहाचा कायदाचा वापर गुलामांसाठी होत होता. व कोणाच्या तरी इशा-यावर गुन्हा दाखल करण्यात येत असे. असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फवाद चौधरी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, “लाहोर उच्च न्यायालयाने फौजदारी संहितेचे कलम १२४ ए असंवैधानिक घोषित केले आहे आणि राज्य संस्थांवर टीका करण्याचा घटनात्मक अधिकार मान्य केला आहे.”