23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडालक्ष्य सेनने साधले सुवर्णावर लक्ष्य

लक्ष्य सेनने साधले सुवर्णावर लक्ष्य

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील सुवर्ण धडाका कायम ठेवला. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ची याँग एनजीचा २१-१९, ९-२१, १६-२१ अशा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. लक्ष्य सेन अवघ्या २० वर्षाचा आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

पीव्ही सिंधूने महिला एकेरीत यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर लगेचेच भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि मलेशियाच्या ची याँग एनजी यांच्यात पुरूष एकेरीची फायलन झाली. लक्ष्य सेन मलेशियाच्या याँग एनजी याच्याविरूद्ध पहिल्या गेममध्ये सुरूवातीला पिछाडीवर पडला होता. मात्र त्याने नंतर गुणांमधील अंतर कमी करत आणले. लक्ष्यने झुंजार खेळ करत १८-१८ अशी बरोबरी देखील केली. मात्र अखेरीस याँग एनजीने २१-१९ असा विजय मिळवला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या