23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रलालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की

लालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद असताना मुंबईतील लालबागच्या राजाच्या मंडपात भाविक आणि सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला असून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी या ठिकाणी होती. त्यानंतर गर्दीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आज देशभरात आणि जगभरात गणेशाचं स्वागत केलं जात आहे. मानाच्या गणपतीच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना सुरू असून ढोलताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत केले जात आहे. मुंबईतील लालबागचा राजावर खूप जणांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक दिग्गज येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते. या गर्दीमुळे हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भाविकामध्ये आणि सुरक्षारक्षक यांच्यामध्ये बाचाबाची झाली असून बराच वेळ हा वाद सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी समजुत काढून हा वाद मिटवला आहे. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षकांत हा प्रकार घडला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या