27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाआयपीएल २०१९मध्ये फिक्सिंग झाल्याचा ललित मोदींचा दावा

आयपीएल २०१९मध्ये फिक्सिंग झाल्याचा ललित मोदींचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: आयपीएल आणि वाद याचे जुने नाते आहे. कधी खेळाडूंच्यात तर कधी स्पर्धेत फिंिक्सगचे आरोप लागले. आयपीएलचा १५वा हंगाम सुरू आहे आणि प्लेऑफसाठीमध्ये पोहोचण्याची चुरस वाढली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे आयपीएल टी-२० लीग पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
आयपीएल २०१९ मध्ये झालेल्या कथित स्पॉट फिंिक्सग प्रकरणी सीबीआयने पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सात संशयित सट्टेबाजांच्या विरोधात ऋकफ दाखल केलाय. दुस-या बाजूला २०१९चा एक व्हिडियो व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडिओ हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा आहे. हा व्हिडिओ आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २०१९ साली शेअर केला होता. या व्हिडिओत दावा केलाय की ऋषभ पंतला आधीपासून माहिती होते की कधी चौकार मारला जाणार आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला होता.

नेपाळचा खेळाडू संदीप लामिछाने हा गोलंदाजी करत होता, तर फलंदाज रॉबिन उथप्पा होता. चेंडू टाकण्याआधीच पंत म्हणाला, असेही चौकारच असेल. उथप्पाने लगेच शानदार चौकार मारला. हा व्हिडिओ शेअर करताना ललित मोदी म्हणतात, काय जोक आहे… माझा विश्वास बसत नाहीय. मॅच फिंिक्सग आता मोठ्या स्तरावर होतेय. आयपीएल, बीसीसीआय आणि आयसीसी कधी जागे होणार, लाजिरवाणे. अधिका-यांना खरच कोणतीही काळजी नाही.
आयपीएल २०१९मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवले होते. तेव्हा मुंबईने चेन्नई सुपरकिंग्जचा १ धावाने पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या