21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीय​​​​​​​लालूंची प्रकृती नाजूक; शरीराची हालचाल बंद

​​​​​​​लालूंची प्रकृती नाजूक; शरीराची हालचाल बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. येथे त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले, त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर उपचार सुरू केले जातील. सद्यस्थितीत त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही.

तेजस्वींनी सांगितले की, ‘पाय घसरून पडल्यामुळे लालूंना ३ ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. दुसरीकडे, लालूंसाठी देशभरात प्रार्थना सुरू आहे. पाटण्याच्या मंदिर व मस्जिदींत त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. छोटी मुलेही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.’

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी पाटण्याच्या पारस रुग्णालयाला भेट देऊन लालूंच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

तेजस्वी म्हणाले की, ‘वडिलांना वेगवेगळी औषधी दिली जात आहेत. आता ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी देण्यात येणा-या औषधींचा दुष्परिणाम हार्ट किंवा किडनीवर पडू नये यासाठी त्यांना एम्समध्ये आणण्यात आले आहे. येथे त्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या