22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडधुळ्यांनतर नांदेडात तलवारींचा मोठा साठा जप्त

धुळ्यांनतर नांदेडात तलवारींचा मोठा साठा जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : धुळे शहरात तलवारींचा मोठा साठा सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली असल्याची घटना ताजी असताना आता नांदेड शहरातही तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहराच्या विविध भागात पोलिसांच्यावतीने सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत आहे. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाव्हुळे यांना मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील गोकुळनगर भागात कारवाई करून एका ऑटोसह पंचवीस तलवारी जप्त केल्या आहेत. येथील रोड नंबर २६ वर ऑटो क्रमांक एमएच २६ एन ५२२४ यात विना परवाना, बेकायदेशीररित्या २५ तलवारींचा साठा घेऊन जाताना ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या