27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयसमुद्रात सापडला ड्रग्जचा मोठा साठा

समुद्रात सापडला ड्रग्जचा मोठा साठा

एकमत ऑनलाईन

मुंबई : लक्षद्वीपच्या जवळ समुद्रात ड्रग्जची आणखी एक मोठी खेप डीआरआयच्या मदतीने तटरक्षक दलाने जप्त केली आहे. डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीपजवळील समुद्रात ऑपरेशन खोजबीन अंतर्गत १५२६ कोटी किमतीचे २१९ किलो हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात आणले जाणारे सुमारे २५ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, ७ मे रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाला गुप्त माहिती मिळाली होती की, लक्षद्वीपजवळील समुद्रात ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार आहे. या माहितीवरून डीआरआयने भारतीय तटरक्षक दलाची मदत घेतली.

यावेळी आयसीजीएस सुजित या कोस्ट गार्ड जहाजावर डीआरआय अधिकारीही तैनात करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच अरबी समुद्रात पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती.

सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती
दरम्यान, १८ मे रोजी डीआरआयने तटरक्षक दलाच्या मदतीने प्रिन्स आणि लिटल-जिसस या दोन संशयास्पद बोटींचीही झडती घेतली होती आणि प्रत्येकी एक किलोची २१९ पाकिटे सापडली. ही सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती. चौकशीत दोन्ही बोटींच्या कर्मचा-यांनी ड्रग्जची ही खेप समुद्रातच मिळाल्याचे सांगितले.

हेरॉईनची ही खेप भारतात आली कुठून?
ड्रग्ज मिळाल्यानंतर डीआरआय आणि तटरक्षक दलाने बोटी कोचीला आणल्या आहेत. याठिकाणी या बोटींबाबत चौकशी करण्यात येणार आहे. जेणेकरून हेरॉईनची ही खेप कोठून आली आणि ती भारतात कोठून पाठवली जाणार होती हे कळू शकेल.

भारतात पकडण्यात आलेली औषधांची चौथी मोठी खेप
डीआरआयच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल २०२२ पासून भारतात पकडण्यात आलेली ही औषधांची चौथी मोठी खेप आहे. गेल्या एका वर्षात एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत देशाच्या सागरी सीमेवरून विविध विमानतळांवर ३८०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या पकडलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २६ हजार कोटी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या