पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे रोजी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेज बाबतची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या रोज पत्रकार परिषद घेऊन करत आहेत. स्थलांतरीत मजूर, लघु-कुटीरोद्योग, पीएफ, खाणकाम, प्रवास, शेतकरी, रेशनकार्ड धारक, अशा विविध घटकांसाठी या ४ दिवसांमध्ये विविध घोषणा करण्यात आल्या. आज पाचवा व शेवटच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्या मुख्यतः मनरेगा, आरोग्य आणि शिक्षण, उद्योग संबंधित आहेत.
मनरेगा
मनरेगा रोजगारनिर्मिती योजनेच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केली आहे. अर्थमंत्री म्हणाले की मनरेगाचे बजेट ४० हजार कोटींनी वाढविण्यात आले आहे. यापूर्वी मनरेगाचे बजेट ६१ हजार कोटी होते, आता ते ४० हजार कोटी करण्यात आले आहे.
Read More स्थलांतरित मजुरांसाठी मोदी सरकारची मोठी तरतूद!
आरोग्य
सार्वजनिक क्षेत्रात आरोग्य आणि वेलनेस केंद्रांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाईल. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये ही तरतूद केली जाईल. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालयात इन्फेक्शिअस डिसीज केंद्र, ग्रामीण भागात पब्लिक हेल्थ लॅब सर्व ब्लॉक पातळीवर सुरू करण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही भविष्यकालीन साथीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर राहू.
Read More संरक्षण क्षेत्रात 74 % FDI,तर कोळसा उद्योगाला 50 हजार कोटी
शिक्षण
ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा डीटीएचवर चॅनेल तयार करणार असून सध्याच्या घडीला डीटीएचवर असे तीन चॅनल असून त्यात आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. इंटरनेटच्या सुविधेचा ज्या विद्यार्थांकडे अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचे असल्याचे त्या म्हणाल्या. ई-कॉन्टेंटची निर्मितीही चॅनलद्वारे होईल. त्याचबरोबर वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. यासाठी पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार असून विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल कार्यक्रम देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. तसेच देशातील अग्रगण्य १०० विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
उद्योग
कोरोनाच्या संकटकाळात ज्या छोट्या कंपन्यांना नुकसान होईल, त्यांना डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकलं जाणार नाही. एक वर्षभरासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगांवर (MSME) दिवाळखोरीची कारवाई न होवो, यासाठी किमान मर्यादा १ लाख ते १ कोटी करण्यात आली आहे.
Read More केंद्र सरकारकडून आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यास ५० लाखांचं विमा कवच
कंपनी अॅक्ट
कंपनी कायद्यातील बहुतेक तरतुदींना डिक्रीमेंटल केले जाईल. दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर एक वर्षासाठी बंदी घातली जाईल. म्हणजेच, कर्ज देताना डिफाल्ट एका वर्षासाठी दिवाळखोरीमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. छोट्या उद्योगांच्या दिवाळखोरीची मर्यादा एक लाखांवरून एक कोटी केली जाईल.
खासगी कंपन्यांना संधी
सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांना परवानगी असलेल्या क्षेत्रांची यादी नव्याने तयार करण्यात येईल. खासगी कंपन्यांना यामुळे नव्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा आणि गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होईल. जी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी ठरवली जातील, अशा ठिकाणी किमान १ आणि कमाल ४ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या असतील. अशा ठिकाणी खासगी कंपन्यांना नव्याने स्पर्धा करण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली जाईल. याची सविस्तर यादी आणि घोषणा लवकरच केली जाईल
सीतारामन म्हणाल्या, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून मागील दोन महिन्यांच्या काळात सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. ही मदत पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीने थेट मदत करता आली. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
त्याचबरोबर सरकारकडून स्थलांतर करणाऱ्या मजुरांची काळजीही घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारकडून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या भाड्याच्या ८५ टक्के खर्च केंद्राने उचलला आहे. सरकारने प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. अन्न धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आल्याची माहिती सीतारमन यांनी दिली.