19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८४.८३ %

लातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८४.८३ %

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १८ हजार १६७ इतकी असून उपचाराने बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १५ हजार ४१२ एवढी आहे. जिल्ह्यात औषध उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याने कोरोनाबाबधित रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये,
यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशानूसार जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सातत्याने सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत प्रत्येकी सरासरी २०० जणांना कोरोना विषाणुचा संसर्ग होतो. त्यामुळे लातूर शहरासह लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकुर, शिरुर अनंतपाळ या सर्वच ठिकाणी सरकारी रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील आरोग्य सुविधा अधिक प्रमाणात वाढविण्यात आलेल्या आहेत.

काहीं दिवसांपुर्वी सरकारी रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्णांना खाटा मिळणे अशक्य झाले होते. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांत जावे लागायचे पण, तिथेही खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची कुचंबना व्हायची. आज खुप नाही पण ब-यापैकी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे संबंधीत यंत्रणेकडून सांगण्यात येते.

लातूर जिल्ह्यातील गेल्या आठ महिन्यांचा कोरोना विषाणुच्या संसर्गाचा आलेख पाहिला तर तो सातत्याने चढाच राहिलेला दिसून येतो. एप्रिलमध्ये जिल्ह्यात केवळ १६ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली आणि कोरोनाचा मीटर वेगात धाऊ लागला. मे महिन्यात ११९, जुनमध्ये २१४, जुलैमध्ये १८५१, ऑगस्ट महिन्यात ५९११, सप्टेंबरमध्ये ९१८८ आणि ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६७७ एवढी आहे.

आज जिल्ह्यातील कोरोना संसर्ग काहिंसा आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३६ टक्के असल्याने बाजारापेठेतील गर्दी वाढू लागली आहे. लातूर जिल्हृाातील गृहविलगीरकण केलेल्या व्यक्तींची संख्या ७८ हजार १७४ इतकी आहे. १४ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेल्या व्यक्ती ७७ हजार ४१ आहेत. अद्याप गृहविलगीकरणात ११३३ व्यक्ती आहेत. संस्थात्मक अलगीकरणातही लातूर जिल्ह्याने आघाडी घेतलेली दिसून येते.

आज घडीला २० हजार १३६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. १९ हजार ५३५ व्यक्तींनी १४ दिवसांचा कालवाधी पुर्ण केलेला आहे. अद्याप ६०१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. गृहविलगीकरण आणि संस्थात्मक अलगिरकरणात असलेल्या व्यक्तींवरही प्रशासनाची नजर असल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचा दावा केला जात आहे.

मृत्यूदर कमी करण्यात यश
लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतची कोरोनाबाधितांची एकुण संख्या १८ हजार १६७ एवढी आहे. तर उपाराने बरे होऊन घरी गेलेल्याची संख्या १५ हजार ४१२ इतकी आहे. दुर्दैवाने आजपर्यंत ५२४ जणांचा मृत्यू झालेला आहे. लातूर जिल्ह्याचा मृत्यू दर २.८ एवढा आहे. जिल्ह्यात कोरोना संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण ब-यापैकी असल्यामुळेच मृत्यू दर कमी करण्यात यश मिळाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

ऊस तोडणी व वाहतुक करणा-या कामगारांसाठी ५० बेडचे कोविड सेंटर उभारणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या