24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरकरांना धक्का, जिल्ह्यात नव्याने १३ रुग्ण वाढले

लातूरकरांना धक्का, जिल्ह्यात नव्याने १३ रुग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

दिनांक २७.०५.२० रोजी लातूर जिल्ह्यातील  एकूण १७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  चार व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.

त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित होता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो १३ मे रोजी पुणे येथून प्रवास करून आलेला असून नांदेड रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे व तो मूळचा भातांगळी येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो ऑक्सिजन वर असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील १६ व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी  १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ०४ व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ११८ वर पोहोंचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या