27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeम्हाडा पेपरफुटी प्रकरणी वकिलास अटक

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी वकिलास अटक

एकमत ऑनलाईन

जळगाव : दीड वर्षांपासून गाजत असलेल्या टीईटी घोटाळ््याचा तपास करीत असलेल्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावातून एका वकिलास अटक केली. टीईटीचा तपास करीत असताना म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात ही अटक करण्यात आली.

राज्यभरात गाजलेल्या घोटाळ््याचे धागेदोरे जळगावात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. ऍड. विजय दर्जी असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. दर्जी हे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य असून बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात.

या गुन्ह्याचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. ऍड. दर्जी यांच्या बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पुणे पोलिसांचे पथक आले. दर्जी यांच्या कार्यालयातील एक कर्मचा-यांची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. यात अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार बुधवारी पथकाने चौकशीअंती दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या