24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयट्विटरमध्ये गळती सुरूच, आणखी तिघांचा राजीनामा

ट्विटरमध्ये गळती सुरूच, आणखी तिघांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ट्विटर डीलनंतर कंपनीतील वाद हळूहळू वाढत चालला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक बडे अधिकारी कंपनीला राम-राम ठोकत आहेत. एकीकडे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि इलॉन मस्क ट्विटरवर आमने-सामने आले आहेत, तर दुसरीकडे कंपनीतून कर्मचा-यांच्या बाहेर पडण्याचा सपाटा सुरूच आहे. इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरला ४४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याची घोषणा केली. पण, ताज्या माहितीनुसार, मस्क यांनी हा करार सध्या होल्डवर ठेवला आहे. या दरम्यान, कंपनीतील तीन वरिष्ठ अधिका-यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिका-यांनी ट्विटर सोडण्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

रिपोर्टस्नुसार, प्रोडक्ट मॅनेजमेंट फॉर हेल्थ, कन्व्हर्सेशन आणि ग्रोथच्या उपाध्यक्ष इल्या ब्राऊन, ट्विटर सर्व्हिसेसच्या उपाध्यक्ष कतरिना लेन आणि डेटा सायन्सचे प्रमुख मॅक्स स्मायझर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. इलॉन मस्क यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे या सर्व अधिका-यांनी राजीनामे दिले आहेत.

लेन आणि मॅक्स स्मायझरच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, ते दोघेही सुमारे दीड वर्षापूर्वी ट्विटरशी जोडले गेले होते, तर इल्या ब्राऊन गेल्या ६ वर्षांपासून ट्विटरशी संबंधित होत्या. कंपनीने या सर्वांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन उच्च अधिका-यांना काढून टाकले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या