21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रविधीमंडळ अधिवेशन १० ऑगस्टपासून?

विधीमंडळ अधिवेशन १० ऑगस्टपासून?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला बुधवार दि. १० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तशा आशयाचे परिपत्रक विधीमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आले असून त्यासाठी मंगळवारची मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशी विधीमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी अधिवेशन बुधवार, दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार ते गुरुवार दि. १८ ऑगस्ट या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या असून उपरोक्त कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य आहे.

उद्या शपथविधी, १८ मंत्री शपथ घेणार
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाचे मिळून १८ मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. एकूण २० जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात सावध पवित्रा
उद्याचा हा विस्तार तूर्तास छोटेखानी होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या