श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव गावातील शेतकरी घराजवळील विहिरी वरती गेले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. या भागात अनेक दिवसापासून सायंकाळच्या वेळेस शेतात शेतकऱ्यांना बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. आता दिवसा बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भागामध्ये लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.
या परिसरामधील वाड्या वस्त्यांवर येऊन वन अधिकारी पाहणी करून बिबट्या पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. वन विभागाने ताबडतोब ढवळगाव परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावण्याचा बंदोबस्त करावा जर भविष्यात एखादी मनुष्यहानी किंवा जनावरे मारण्याच्यी घटना घडल्यास तर त्याला सर्वस्वी वनखाते जबाबदार राहील, तसेच वन खात्याने पिंजरा लावण्यास वेळ काढूपणा केल्यास आंदोलन करू , असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.