27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र२०२४ ला बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते ; चंद्रशेखर बावनकुळेंचे आव्हाडांना प्रत्युत्तर

२०२४ ला बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते ; चंद्रशेखर बावनकुळेंचे आव्हाडांना प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘‘बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायाच्या नखावरची धूळ पण उडणार नाही. उद्धरली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे!’’, अस्े ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘जितेंद्र आव्हाडांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या. २०२४ ला निवडणुका होतील त्यावेळेस बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते.
कोण उद्ध्वस्त होते हे कळेलच की’’, असे बावनकुळे म्हणाले. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असेही ते म्हणाले.

आमचे ‘मिशन मुंबई’ अथवा ‘मिशन बारामती’ही नाही. आम्ही पूर्ण ताकदीने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप युती करूनच लढणार आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्र पुन्हा ती चूक करणार नाही. याआधी आमच्यावर राज्याने विश्वास दाखवला आहे. इथून पुढेही दाखवतील. मधल्या काळात दगाफटका झाला. तो ही राज्याने पाहिला, पण आता तसे होणार नाही. कारण शिंदे आणि फडणवीस हे वरवर एकत्र नाहीत तर ते अंतरमनाने जोडले गेलेत. शिवाय तळातील शिवसैनिक सुद्धा शिंदेंच्या पाठीशी असल्याचे मी पाहिलेय, असे बावनकुळे म्हणाले.

‘‘भाजपने ठाणे लोकसभा आपल्याकडे असावी असा दावा केलेला नाही. आम्ही संघटनात्मक ताकद वाढवत आहोत. शिंदे जो उमेदवार देतील त्यांचेच भाजप काम करेल. एकनाथ शिंदे लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्यास भक्कम पाठिंबा देण्यासाठी भाजप तिथे काम करतेय’’, असेही बावनकुळे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या