25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयहलके स्वदेशी हेलिकॉप्टर आज हवाई दलात

हलके स्वदेशी हेलिकॉप्टर आज हवाई दलात

एकमत ऑनलाईन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती
जोधपूर : ३ ऑक्टोबर म्हणजेच सोमवार हा दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हवाई-शक्ती आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने खूप महत्त्वाचा दिवस असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलएसीएच) औपचारिकपणे हवाई दलात सामील होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय हवाई दलाचे पहिले स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर जोधपूरमध्ये एलसीएच सीमेजवळ तैनात केले जाईल आणि सोमवारी लष्करी समारंभात संरक्षण मंत्री स्वत: एलसीएच हवाई दलाला सुपूर्द करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (सीसीएस) या वर्षी मार्चमध्ये १५ स्वदेशी लाइट अटॅक हेलिकॉप्टर (एलएएच) खरेदीला मंजुरी दिली होती. एचएएलकडून ही हेलिकॉप्टर ३३८७ कोटींना खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी १० हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि ५ भारतीय लष्करासाठी आहेत.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार एचएएलने एलसीएच एव्हिएशन कॉर्प्सला दोन हलकी लढाऊ हेलिकॉप्टर सुपूर्द केली आहेत. एलसीएच हे देशातील पहिले अटॅक हेलिकॉप्टर आहे जे सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने तयार केले आहे.

हेलिकॉप्टरचे वजन ६ टन
-लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएच हेलिकॉप्टरचे वजन सुमारे ६ टन आहे. त्यामुळे ते खूपच हलके आहे, तर अमेरिकेतून घेतलेल्या अपाचे हेलिकॉप्टरचे वजन सुमारे १० टन आहे. कमी वजनामुळे एलसीएच आपल्या क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. एलसीएच अटॅक हेलिकॉप्टर मिस्ट्रल हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खास फ्रान्समधून आणलेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या