24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयडोळ्यादेखत कोसळली वीज; गुजरातमधील थरारक व्हिडीओ

डोळ्यादेखत कोसळली वीज; गुजरातमधील थरारक व्हिडीओ

एकमत ऑनलाईन

पालीताना, 03 जून : निसर्ग चक्रीवादळाचा धोका गुजरातसह महाराष्ट्राला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता हे वादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. या वादळादरम्यान अंगावर शहारे आणणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. चक्रीवादळामुळे विजांच्या क़डकडाटासह अनेक भागांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्याचवेळी वीज एका झाडावर कोसळते आणि आग लागते.

अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडीओ गुजरातमधील पालीताना या परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये झाडावर वीज कशी कोसळते ते दिसत आहे. गुजरातमध्ये निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे. गुजरातमध्ये समुद्रकिनाऱ्यावर एनडीआरएफ, कोस्टगार्ड आणि पोलीस तैनात करण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यालगच्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Read More  प्रियकराने फसवल्यामुळे कन्नड अभिनेत्री चंदनाने केली राहात्या घरी आत्महत्या

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. 90 ते 100 किलोमीट ताशी वेगानं वारे वाहात आहेत त्याचा वेग 190 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या