26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeक्रीडालाईव स्कोर : भारताने १५ षटकात चार गडी बाद ७० धावा, हार्दिक...

लाईव स्कोर : भारताने १५ षटकात चार गडी बाद ७० धावा, हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल क्रीजवर

एकमत ऑनलाईन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. कसोटी मालिका २-१ ने ंिजकल्यानंतर भारतीय संघाला वनडे मालिकाही ंिजकण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन कप्तान स्टीव्ह स्मिथ नेतृत्वाखाली वनडे मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी त्याच्या संघाने कंबर कसलेली आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवलेले आहे.

भारताचा पहिली विकेट :

१८९ धावांचा पाठलाग करताना भारताची पहिली विकेट पाच धावांवर पडली आहे. ईशान किशन तीन धावा करून बाद झाला. त्याने आठ चेंडूंत तीन धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने त्याला विकेट्ससमोर पायचीत (एलबीडब्ल्यू) केले. चार शटकानंतर भारताची स्थिती १५/१ अशी होती.

भारताची दुसरी विकेट :

१६ धावांच्या स्कोअरवर भारताला मोठा धक्का बसला. नऊ चेंडूत चार धावा करून विराट कोहली, मिचेल स्टार्कचा बळी ठरला. स्टार्कने त्याला विकेट्ससमोर पायचीत (एलबीडब्ल्यू) केले.

भारताची तिसरी विकेट :

भारताला १६ धावांच्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला. मिचेल स्टार्कच्या सिं्वग होणा-या चेंडूंना भारतीय फलंदाजांकडे कोणतेही उत्तर नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली. विराट कोहलीपाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. स्टार्कनेही त्याला विकेट्ससमोर पायचीत (एलबीडब्ल्यू) केले. त्याला खातेही उघडता आले नाही. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २० धावा अशी झाली.

पॉवरप्लेनंतर भारताचा स्कोर ३९/३ :

189 धावांचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावून 39 धावांपर्यंत मजल मारू शकली. शुभमन गिल आणि लोकेश राहुल क्रीजवर होते व दोघांनी 23 धावांची भागीदारी केली. भारतीय डावाला हळूहळू पुढे नेण्याचे काम केले.

भारताची चौथी विकेट :

शुभमन गिल ३१ चेंडूत २० धावा करून बाद झाला. स्टार्कच्या चेंडूवर मार्नस लबुशेनने त्याचा झेल टिपला. ३९ धावांवर भारताची चौथी विकेट पडली. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. या सामन्यातील मिचेल स्टार्कला तिसरे यश प्राप्त झाले. लोकेश राहुल याने १७ धावा २३ चेंडुत तीन चौकरांसह खेळत आहे तर हार्दिक पांड्या याने ११ धावा १२ चेंडुत काढुन क्रिजवर खेळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या