24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeस्थानिक स्पर्धांना प्राधान्य द्यावे!

स्थानिक स्पर्धांना प्राधान्य द्यावे!

एकमत ऑनलाईन

आयपीएल’ला प्रथम पसंती; भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत

नवी दिल्ली : करोनामुळे झालेली क्रीडाक्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपेक्षा द्विराष्ट्रीय मालिका आणि स्थानिक स्पर्धाचे आयोजन करण्याकडे आयसीसी आणि बीसीसीआयने अधिक लक्षकेंद्रित करावे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.

Read More  देशासाठी बंदुक हातात घेईन : हरभजन

करोनाचे संकट टळल्यावर थेट विश्वचषकाचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल. त्यापूर्वी स्थानिक पातळीवरील स्पर्धा सुरू करून द्विराष्ट्रीय मालिकांना प्रारंभ करावा, असे शास्त्री यांना वाटते. करोनाचा फैलाव कमी झाल्यास थेट विश्वचषकाची तयारी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यापूर्वी सर्वप्रथम सर्व खेळाडूंची आरोग्यचाचणी करून त्यांना देशांतर्गत स्थानिक स्पर्धा खेळण्यास सांगावे. त्यानंतर विविध देशांमध्ये एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकाराच्या द्विराष्ट्रीय मालिकांना प्रारंभ करावा, हे सर्व सुरळीतपणे झाल्यावरच मग जागतिक स्तरावरील स्पर्धाचा विचार करावा,’ असेही शास्त्री म्हणाले. आम्हाला जर विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकेतून एकाची निवड करण्यास सांगितले, तर नक्कीच भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेला प्राधान्य देईल.

कारण १५ देश एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विश्वचषक खेळण्यापेक्षा कोणत्याही एकाच संघासह एखाद-दुस-या मैदानांवर मालिका खेळणे आम्हाला आवडेल. त्यामुळे ‘आयसीसी’ने परिस्थितीचा आढावा घेऊनच विश्वचषकाबाबत निर्णय घ्यावा,’’ असेही शास्त्री यांनी सांगिले. त्याचप्रमाणे जेव्हा क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होईल, त्या वेळी आम्ही विश्वचषकासारख्या स्पर्धाऐवजी ‘आयपीएल’ला प्रथम पसंती देऊ, असे शास्त्री यांनी नमूद केले. ‘‘आयपीएलला प्राधान्य देण्यामागे प्रमुख कारण म्हणजे सर्व सामने भारतातील एक अथवा दोन राज्यांत खेळता येऊ शकतात. त्याशिवाय खेळाडूंना देशांतर्गत वातावरणाची पूर्ण जाणीव असल्यामुळे आपसूकच ते सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे भान राखतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या