लॉकडाऊन ४.०: राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला

992

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असूनराज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, मालेगाव, नाशिक, सातारा, औरंगाबाद या शहरात कोरोनाचा शिकरकाव मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे योग्य पालन न केल्यामुळे या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाग्रस्ताची आकडेवारी एवढी चिंताजनक आहे की आपण या आकडेवारी चिनलाही मागे टाकले असून देशाच्या हिताच्या दृष्टीने ही बाब चिंतेची समजली जात आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही

राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना सरकारने इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण याआधी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे”.

काटोकोरपणे पालन करावे अशा सुचना
देशात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात ३१०मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात असून त्याचे काटोकोरपणे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.

Read More  कोरोना संकटातून राष्ट्रवादाला बळकटी

२४ तासांत देशात कोरोना विषाणूची ४९८७ घटना आल्या समोर
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ४९८७ घटना घडली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते देशातील गेल्या २४ ाासांत कोरोना विषाणूमुळे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे.

२८७२ लोक मरण पावले
देशात एकूण ९०,९२७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी २८७२ लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रविवारी (१७ मे) सकाळी ८वाजेपर्यंत देशभरात एकूण ९०,९२७ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५३९४६ रूग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, तर, ३४,१० ३२ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. देशात कोरोनामुळे २८७२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read More  कोरोनाचे नमूने नष्ट केल्याचं चीननं केलं मान्य!

कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1261927931657351169