26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील १३ शहरे सोडून लॉकडाऊन संपण्याची शक्यता

देशातील १३ शहरे सोडून लॉकडाऊन संपण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून एक नव्या गाईडलाईन्स आखण्याचे काम सुरू आहे. यानुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. देशातील केवळ १३ शहरांत सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ३० मेरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली. ३१ मे रोजी येत्या १५ दिवसांसाठी लागू करण्यात येणारे दिशानिर्देश जाहीर केले जाऊ शकतात.

Read More  मलेशियाच्या माजी पंतप्रधानांची मुलांसह पक्षातून हकालपट्टी!

सर्वाधिक संक्रमण आढळलेली शहरे अर्थात, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता/हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरमध्ये लॉकडाऊनचे नियम यापुढेही सुरू राहू शकतात.

हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरन्ट १ जूनपासून उघडण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. देशात सध्या हॉटेल्स सोडून हॉस्पीटॅलिटी सेवा संपूर्णत: ठप्प आहे. तसेच, पोलीस, अधिकारी आणि आरोग्य सेवा यंत्रणा कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १ जूनपासून सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सेवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसहीत सुरू केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी होणाºया मन की बात, या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या