24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलॉकडाऊनमुळे लघु उद्योजक आर्थिक अडचणीत

लॉकडाऊनमुळे लघु उद्योजक आर्थिक अडचणीत

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : कोरोना वायरस कोविड १९ च्या संसर्गापासून बचावासाठी लॉक डाऊन करण्यात आल्याने संपुर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. या लॉक डाऊनच्या संचारबंदीत घराबाहेर निघण्यास व जमावबंदी घालण्यात आल्याने तालुक्यातील अनेक लघु उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत. दररोज काम करून त्या पैशावर कुटूंब चा उदरनिर्वाह करण्यावर विपरित परिणाम पडला आहे़ हाताला काम नाही त्यामुळे पैसा नाही़ लॉकडाऊन सर्वसामान्य लघु उद्योजकांच्या मुळावर आले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ शासनाने त्वरीत मदत करावी अशी मागणी या लघु उद्योजकांकडून केली जात आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात लघु उद्योजकांना गेल्या दोन महिन्यापासून आपली दुकाने बंद ठेवावी लागल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून या पुढील काळात लॉकडाऊन वाढला तर संसाराचा गाडा कसा चालवायचा व दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्­न लघु उद्योजकांना पडला असून या मधील चहा स्टॉल, पान टपरी, वडापाव सेंटर, भंगार दुकान, भाजीपाला-फळ स्टॉल, शितपेय गृह, आॅईसक्रिम पार्लर, रसवंतीगृह, बाजारातील कापड विक्रेते, कटलरी सामान विक्रेते,पादत्राणे विक्रेते,चिकन सेंटर, टिव्ही दुरुस्ती, दुचाकी दुरूस्ती गॅरेज यांच्यासह प्लॅस्टिक सामान विक्रेत्यांचे व्यवसाय सध्या बंद पडले आहेत.

Read More  नांदेडमध्ये लॉकडाऊनचा पहिला बळी

यातील काही व्यवसायांना उभारण्यासाठी बँका, पतसंस्था तर अनेकांना प्रसंगी खाजगी सावकराकडून कर्ज घेऊन आपले उद्योग उभे करावे लागले आहेत. यात गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाची रक्कम थकली आहे. त्यात सध्या उद्योग ही बंद असल्याने व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी वयापुढे लॉकडाऊनची मर्यादा वाढल्यास घर कसे चालवायचे व घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न पडला असून हे लघु उद्योजक आर्थिक चिंतेत सापडले आहेत.

वर्षभर थंड असलेल्या व्यवसायांना शाळांना सुट्या व लग्नसराईमुळे मार्च, एप्रील व मे महिन्यात खरी भरभराट सुरू होते. ग्रामीण भागातील हे लहान मोठे व्यवसाय माणसांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेलेले असतात. चहापाणी, झटपट नास्टा, शितपेये, सुपारीसह इतर हलके फुलके खाण्यासाठी मोठी गर्दी झालेली असते. त्यामुळे या तीन महिन्यात वर्षभराची कमाई होत असते. पण यंदा या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे संपुर्ण व्यवसाय ठप्प झाले आहेत.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक तरूणांनी बँक, पतसंस्था तर प्रसंगी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. दररोज जी रक्कम गोळा होईल त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह, दैनंदिन खर्च करून कर्जाची रक्कम फेडण्याचे काम करीत असत. पण सध्याच्या प्रदीर्घ लॉक डाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात लॉकडाऊन नंतर दुकान उघडले तरी दुकानाचे भाडे, वीजबील व परत कच्चे भांडवल उभा करण्यासाठी जवळ पैसा नसल्याने हे लघु व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. त्यामुळे शासनाने लघु उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे आवश्यक आहे.
-पंडित तांबोळकर, शिरुर अनंतपाळ.
-सिराज मुल्ला, साकोळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या