बर्लिन: जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत़ मात्र जर्मनीसह अन्य युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी अटोक्यात येत असल्याने अनेक देशांनी शुक्रवारी सीमानिर्बंध शिथिल केले आहेत़ काही शहरांमधील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरुवात होत आहे़ मात्र कोणत्याही ठिकाणचे लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्यात आलेले नाही़ मेक्सिको व अन्य काही ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे अशा ठिकाणी लॉकडाऊन सुरूच ठेवण्यात आले आहे.
Read More लातूर : सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार दुकाने
स्लोव्हेनियाने कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याचे घोषित करत लॉकडाऊनचे नियम शिथिल केले. त्यामुळे आॅस्ट्रिया, इटली आणि हंगेरीतून या देशात प्रवेश करता येणार आहे. जर्मनीनेही सीमानिर्बंध उठवले असून, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि आॅस्ट्रियातून इथे येणा-याची संख्या वाढू लागली आहे. युरोपियन युनियन व ब्रिटनसह अन्य युरोपियन देशांतून येणा-यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्याचा नियम मागे घेण्यास जर्मनीतील राज्ये तयार झाली आहेत. दोन महिन्यांच्या खंडानंतर प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अनेक जर्मन राज्यांनी हॉटेल पुन्हा सुरू केली.
Read More लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले
उतर युरोपमधील अॅस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुआनिया यांनी बाल्टिक देशांसोबतचे प्रवासाने निर्बंध हटवले आहेत. आॅस्ट्रिया व स्वीत्झर्लंड यांनीही सीमानिर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून, आॅस्ट्रियात कॅफे व रेस्तराँ उघडण्यात आले आहेत. आॅस्ट्रेलियाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साऊथ वेल्स राज्यात कॅफे व रेस्तराँ उघडण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर सिडनीमध्ये याचे अनुकरण करण्यात आले. राष्ट्रीय कोरोना आणीबाणी उठवण्यात आल्यानंतर जपानमध्ये काही शाळा, हॉटेल व व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. मात्र टोकियोसारख्या अद्यापही धोका असलेल्या ठकाणी निर्बंध कायम आहेत. मेक्सिकोमध्ये १८ मेपासून खाणकाम, बांधकाम व आॅटोउद्योग काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथे गुरुवारी सर्वाधिक २,४०९ नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे.