35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? 

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? 

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत ३१ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चौथ्य टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, हे लॉकडाऊन कसे असेल हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Read More  तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कोल्हापूरातून का निवडणूक लढवली नाही?

राज्यात बुधवारी एकाच दिवसात तब्बल १४९५ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाची गंभीर आकडेवारी पाहता राज्यात लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या संदर्भात महाविकास आघाडीतील महत्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याविषयी चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पण सध्या तरी लॉकडाऊन वाढवण्यावर सरकारचा भर असल्याची चिन्ह आहेत.

पंतप्रधानांकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी लॉकडाऊन वाढवणार असल्याची घोषणा केली. लॉकडाऊन ४ नव्या नियमांसह लागू केला जाईल. राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. १८ मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मात्र लॉकडाऊन ४ नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतीलअसंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या