22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeदेशातील ५ लाख एकरावरील पिकांना टोळधाडींचा धोका!

देशातील ५ लाख एकरावरील पिकांना टोळधाडींचा धोका!

- भारत-पाकिस्तान सीमेवरच्या राज्यांना वाळवंटी टोळांचा जास्त परिणाम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकºयांवर एक मोठे संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काही दहशतवाद किंवा घुसखोरीचे नाही. तर, पाकिस्तानातून येणारे संकट हे टोळधाडीचे आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतक-यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकºयांच्या मालाला बाजारभाव नाही. त्यात हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत.

गेले वर्षभर राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील महत्वाची पीके, गहू, मोहरी, कापूस, भाजीपाला पीकांचे मोठे नुकसान झाले आहे़ साधारण साडेआठ लाख एकरवरील पिकांना याचा फटका बसला होता. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नुकसानींपैकी एक घटना मानली जाते. यात सर्वाधिक नुकसान राजस्थानमध्ये ३३ पैकी १६ जिल्ह्यात, तर मध्यप्रदेशातील १५ जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव झाला.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ही टोळधाड येमेन, सौदी अरेबिया तसेच नैऋत्य इराणमध्ये होती. तिथे नीट नियंत्रण न केल्याने जूनपर्यंत संख्या प्रचंड वाढली आणि डिसेंबरपर्यंत या टोळधाडीने भारत पाकिस्तान सीमेवर आक्रमण केले. आणि दोन्ही देशांची चिंता वाढवली. ही टोळधाड पाकिस्तानमधून भारतात येत असल्यामुळे गेले वर्षभर भारत आणि पाकिस्तानने या संकटाला एकत्र सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरही वाद झाले. पाकिस्तानने वेळेत आणि प्रामाणिकपणे नियंत्रण केले नाही, असे भारतातील तज्ज्ञ मानतात. भारतात टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष टीम नियुक्त केली आहे.

Read More  रेड झोनमधील विमानसेवा सध्या सुरु करणे अशक्य – अनिल देशमुख

टोळधाडी बद्दल थोडक्यात माहिती
* सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केले आहे.
* सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.
* ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच कोरोनाची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान राज्य आणि केंद्र सरकारसमोर आहे.
* सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे
* लोकस्ट म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.
* सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.
*भारताच्या इतिहासात मोठया नुकसान करणाºया १० टोळधाडींची नोंद आहे.
*साधारण ३५ हजार लोकं किंवा २० उंट किंवा ६ हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढे पीक ही टोळ धाड (अंदाजे ४ कोटी) फस्त करु शकते.
*एफएओ म्हणजेच अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसंच सर्व देशांना सावध करत असते.
* टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या