मद्यानंतर तंबाखूसाठी लागल्या लांबच लांब रांगा

  256

  सुरत: वृत्तसंस्था
  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू असला तरी तिस-या टप्प्यातही सरकारने अनेक सुट दिली होती. दरम्यान, त्या कालावधीत मद्यविक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मद्यविक्री करणा-या दुकांनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते.

  परंतु आता लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात तंबाखूच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. यानंतर मद्यविक्रीच्या वेळी असेलेल्या रांगांसारखेच चित्र तंबाखू विक्रीच्या दुकानांसमोरही पाहायला मिळाले. सूरतमधील तंबाखू विक्री करणा-या दुकानांसमोर बुधवारी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणीही लोक तासनतास उभे असल्याचेही दिसून आले.
  कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना तंबाखू मिळाला नाही. परंतु दुकाने सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा मी जिवंत झालो असे वाटत आहे. एका तासापेक्षा अधिक वेळ मी या रांगेत उभा होतो, अशी प्रतिक्रिया तंबाखू घेण्यासाठी आलेल्या एकाने बोलताना दिली.

  Read More  तंबाखूपासून बनलेली करोना लस अधिक परिणामकारक?

  लोक घरापर्यंतही आले
  तंबाखूची दुकाने बंद केल्यामुळे अनेकांना समस्या निर्माण झाली असावी. लॉकडाउनच्या कालावधीत मला इतके फोन येत होते की मला माझा फोन बंद करावा लागला. काही लोकांना माझ्या घराचा पत्ता मिळाला तर ते माझ्या घरापर्यंतही पोहोचले होते, असे एका तंबाखू विक्रेत्याने सांगितले.

  मद्यासाठीही रांग
  लॉकडाउनच्या तिस-या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील मद्यविक्रीच्या दुकानांसमोर अशाच मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते़ मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून त्यानंतर काही राज्यांनी होम डिलिव्हरीची सुविधाही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.