35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home दारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांगा!

दारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांगा!

एकमत ऑनलाईन

दौसा: वृत्तसंस्था
राजस्थानच्या गहलोत सरकारने बीडी, सिगारेट, पान, तंबाखू, गुटखा यांची विक्री राज्यात पुन्हा एकदा सुरू केली आहे. दौसामध्ये या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. पोलिसांनी अनेक ठिकाणी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करवून घेण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. परंतु, धुम्रपानाचे व्यसन असणाºया जनतेला मात्र कोरोनाच्या भीतीपेक्षा तंबाखू, बीडी अधिक महत्त्वाची वाटत होती. त्यामुळे जिल्हा दंडाधिकाºयांनाच यावर कारवाई करत बीडी विक्री तत्काळ थांबवण्याचे आदेश द्यावे लागले.

लॉकडाऊनमध्ये अशीच गर्दी दारुच्या दुकानांसमोरही दिसून आली होती. दारुची दुकाने उघडताच या दुकानांसमोर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आज राजस्थानच्या लालसोटमध्येही शेकडोच्या संख्येने लोक बीडी खरेदी करताना दिसले. यावेळी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.

Read More  संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन! बाबाजानी दुर्रानी यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल

बीडी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सॅनिटायझर तर सोडाच पण मास्कही वापरण्याची तसदी घेतली नव्हती. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नसल्यामुळे इथे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे असल्याचे प्रशासनाच्या तत्काळ लक्षात आले आहे़ पोलिसांना याबद्दल सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. आणि त्यांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, गर्दी एवढी मोठी होती की पोलिसांनाही तिला आवरणे कठीण होऊन बसले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकारी अविचल चतुर्वेदी यांनी गोदामातून बीडी विक्रीसाठी लालसोट एसडीएम यांना सांगून कायदेशीर करण्याचे आदेश दिलेत तसेच, बीडी विक्री तत्काळ बंद करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या