28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा

अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा

एकमत ऑनलाईन

मुंबई: राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा, अशा महत्त्वाच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना दिल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून विश्रांतीवर असलेले राज ठाकरे आता अ‍ॅक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसत आहे. राज ठाकरेंच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया झाली होती. तत्पूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना कशा प्रकारे काम करायचे, याचा संदेश दिला होता.

सोमवारी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि मागील दोन महिन्यात झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच उद्यादेखील राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली असल्याची माहिती हाती आली आहे.

राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना संबोधून म्हटले की, लोकं सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे, अशा अर्थाने पहा. लोकं आपला विचार करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जा, पक्ष संघटन वाढवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

२५ऑगस्टपासून मनसेची सदस्य नोंदणी
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची लवकरच सदस्य नोंदणी सुरु होतेय. २५ ऑगस्टपासून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये मनसेची नोंदणी सुरु केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिल्या आहेत.

भाजपसोबत की स्वबळावर लढणार?
आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत लढणार की स्वबळावर उमेदवार उभे करणार, यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल. अशा सूचना पदाधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या