26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeकमी व्याजदर : आर्थिक संकटात असाल तर घ्या COVID-19 पर्सनल लोन

कमी व्याजदर : आर्थिक संकटात असाल तर घ्या COVID-19 पर्सनल लोन

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांची नोकरी गेली आहे, तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. पण आता असे लोक कोविड-19 पर्सनल लोन घेऊ शकतात. अनेक मोठ्या बँका यावेळी अतिशय कमी व्याजदरावर कोविड-19 पर्सनल लोन देत आहेत.

एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून कोविड-19 पर्सनल लोन दिले जात आहे. कोरोना संकटातून सावरण्यासाठी हे लोन ऑफर केले जात आहे.

याची खासियत ही आहे की, इतर पर्सनल लोनच्या तुलनेत यावर व्याज कमी आहे. सामान्यपणे पर्सनल लोनवर बँक 8.75 टक्केपासून 25 टक्केपर्यंत व्याजदर वसूल करतात. परंतु, कोविड पर्सनल लोनवर व्याजदर 7.20 टक्केपासून 10.25 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

Read More  शिफारसींना मान्यता : कोरोनाची लक्षणे आढळल्यास बदली खेळाडू मिळणार!

कोविड-19 पर्सनल लोन बँक आपल्या सध्याच्या ग्राहकांना देत आहे, यासाठी वर दिलेल्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला गरज असल्यास कोविड-19 पर्सनल लोन मिळू शकते. बँकांचा दावा आहे की, याचा दर सामान्य पर्सनल लोनच्या तुलनेत कमी असेल.

सामान्यपणे बँका पर्सनल लोनवर मनमानीपणे प्रोसेसिंग फी चार्ज करतात, जी 2 टक्के असते. परंतु, देण्यात येत असलेल्या कोविड-19 पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फी कमाल 500 रुपयांपर्यंत चार्ज केली जात आहे. बँकांचे म्हणणे आहे की, कोविड पर्सनल लोन सध्याच्या ग्राहकांसाठी आहे, यासाठी प्रोसेसिंग फी कमी आहे.

बँक 25,000 रुपयांपासून 5 लाख रूपयांपर्यंत कोविड-19 पर्सनल लोन देत आहेत. हे लोन तात्पुरत्या रोकड संकटातून सावरण्यासाठी आहे. यासाठी हे लोन तीन वर्षांसाठी दिले जात आहे. म्हणजे ग्राहकांना कमाल तीन वर्षात लोनची रक्कम परत करायची आहे. तर इतर पर्सनल लोनमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ दिला जातो.

माहितीनुसार कोविड पर्सनल लोन देण्यापूर्वी बँक आपल्या बँक ग्राहाचे क्रेडिट प्रोफाइल आणि मागील रेकॉर्ड बघतात. बहुतांश बँकांमध्ये या लोनची सुविधा 30 जूनपर्यंत आहे. परंतु, पर्सनल लोन शक्यतो लोकांनी घेऊ नये. परंतु, खुपच गरज असल्यास तुम्ही 30 जूनपूर्वी आपल्या ब्रांचमध्ये जाऊन आधी याबाबत सविस्तर माहिती घेऊन, त्यांनतर अर्ज करू शकता.

याशिवाय संकटकाळात देण्यात येत असलेल्या या कर्जावर बँकांनी कोणतेही प्रीपेमेंट शुल्क ठेवलेले नाही. याचा अर्थ असा आहे की, जर एखाद्या व्यक्तीने हे कर्ज तीन वर्षाच्या आत म्हणजे सहा महिन्यात जरी फेडले तरी त्यावर शुल्क वसूल केले जाणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या