27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयएलपीजी कनेक्शन महागले

एलपीजी कनेक्शन महागले

एकमत ऑनलाईन

मुंबई : तुम्ही नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला अधिक ७५० रुपये म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागणार आहेत. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे.

पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते.

आता नियामकासाठी २५० रुपये मोजावे लागणार
त्याचप्रमाणे ग्राहकांना १५० रुपयांऐवजी २५० रुपये रेग्युलेटरसाठी खर्च करावे लागतील. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता ८०० ऐवजी ११५० करण्यात आली आहे.

उज्ज्वला योजनेला महागाईचा फटका
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुस-या सिलिंडरसाठी वाढीव सिक्युरिटी जमा करावी लागेल. मात्र, एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास त्याला पूर्वीप्रमाणेच सिलिंडरची सिक्युरिटी द्यावी लागणार आहे..

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या