28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यभरात २,६६४ जनावरांना लम्पीची लागण; आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

राज्यभरात २,६६४ जनावरांना लम्पीची लागण; आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातले असून राज्यात आजपर्यंत २,६६४ जनावरे संक्रमित झाली आहेत. राज्यातील ३३८ गावांमध्ये हे रुग्ण आढळले असून आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

सध्या लम्पी या आजारावरील १६ लाखांहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी रोग आढळून आला होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जनावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती त्यांनी दिली. लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणा-या दुधातून हा संक्रमित होत नाही.

त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गायी आणि बैलांना होतो. त्यामुळे सध्या राज्यात पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्व शेतक-यांनी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जनावर दगावल्यास मिळणार मदत
लम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास त्याची नुकसानभरपाई शासनाकडून मिळणार आहे. यासंदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहेत लम्पी रोगाची लक्षणे?
प्राण्याची भूक कमी होणे, ताप येणे, अंगावर सूज येणे.
जर तुमच्या प्राण्याला अशी काही लक्षणे दिसत असतील तर लवकरात लवकर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. तसेच विभागाच्या आयुक्तालयातील डॉक्टरांशी सकाळी ८ ते ६ या वेळेत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या