26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम

आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर महाविकास आघाडी कायम राहणार का, अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी युती अभेद्य असल्याचे संकेत दिलेत.

राज्यात आजदेखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आहोत. आमच्या बैठकाही एकत्रित होत असतात. तसेच आगामी काळात होणा-या निवडणुकांमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी आज मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, अनंत गाडगीळ, प्रशांत सुरसे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,.माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक आबा बागुल आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

‘शिवसेनेनं दसरा मेळाव्याची सुरुवात केली’
थोरात पुढं म्हणाले, आज देखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आहोत. आगामी काळात होणा-या निवडणुकांमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत. दसरा मेळाव्याबद्दल होत असलेल्या चर्चाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा ही राजकारणाची बाब होण्याची गरज नाही. ज्या शिवसेनेनं दसरा मेळाव्याची सुरुवात केली आहे. त्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या