27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयमहानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक

महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सोनू सूद पाठोपाठ आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत. यापैकी पहिलं विमान आज (10 जून) सकाळी 6 वाजेच्या सुमारास 180 मजुरांना घेऊन वाराणसीच्या दिशेला रवाना झालं. दुसरे दोन विमानंदेखील आजच रवाना होणार आहेत. मात्र, त्याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या निदर्शनाखाली मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्याचं नियोजन सुरु आहे. याबाबच ‘मिडे डे’ वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांना पब्लिसिटी नकोय
‘सर्व नियोजन अत्यंत सावधगिरीने केलं जात आहे. कारण अमिताभ बच्चन यांना पब्लिसिटी नकोय. स्थलांतरित मजुरांची दुर्दशा पाहून अमिताभ बच्चन स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला’, असं सुत्रांनी सांगितलं.

मजुरांना सुरुवातीला ट्रेनने पाठवण्याचा विचार होता
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी वाराणसीला जाणारं इंडिगो फ्लाइट भाड्याने घेतलं. या फ्लाइटने 180 प्रवाशांना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास विमानतळावर पोहोचण्याचं सांगण्यात आलेलं. या मजुरांना सुरुवातीला ट्रेनने पाठवण्याचा विचार होता. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन बंगाल, बिहार, तमिळनाडू आणि इतर राज्यांच्या स्थलांतरित मजुरांची देखील व्यवस्था करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read More  ‘मि. नटवरलाल’ सिनेमाला झाले ‘41’ वर्षं पुर्ण, बिग बींनी केला खास मेसेज

मजुरांची बसने घरी जाण्याची व्यवस्था केली होती
अमिताभ बच्चन यांनी याअगोदर 29 मे रोजी उत्तर प्रदेशच्या स्थलांतरित मजुरांची बसने घरी जाण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी माहिम दर्गा ट्रस्ट आणि हाजी अली दर्गा ट्रस्ट सोबत 10 बसमधून 250 मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली होती. या दहा बसमध्ये मजुरांच्या जेवणाची आणि मेडिकल किटबाबतच्या सर्व सुविधा होत्या.

दोन महिन्यांपासून गरिबांना मदतीचं काम सुरु
अमिताभ बच्चन यांचं गेल्या दोन महिन्यांपासून गरिबांना मदतीचं काम सुरु आहे. ते विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मुंबईच्या विविध भागातील सर्वसामान्य गरिब कुटुंबांना खाद्य पदार्थांचे पॅकेट्स वाटत आहेत. बच्चन यांच्या कंपनीने आतापर्यंत 1000 कुटुंबांना रेशन पॅकेट्स दिले आहेत. हे रेशन पॅकेट प्रत्येक कुटुंबाला एक महिनाभर पुरतं. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्याकडून आतापर्यंत 2000 रेशन पॅकेट्स, 2000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, 1200 चपलांचे जोडे स्थलांतरित मजुरांना वाटण्यात आलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या