24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रगुन्ह्यांच्या तपासातही महाराष्ट्र आघाडीवर

गुन्ह्यांच्या तपासातही महाराष्ट्र आघाडीवर

एकमत ऑनलाईन

राज्यातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पुरस्कार प्रदान
मुंबई : तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देशभरातील १५१ पोलीस कर्मचा-यांना केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले. एमएचए पुरस्कार विजेत्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो मधील १५, महाराष्ट्र पोलिसांचे ११, मध्य प्रदेश पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी १०, केरळ पोलिस, राजस्थान पोलिस आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे आठ जणांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये २८ महिला पोलिस अधिका-यांचाही समावेश आहे.

२०१८ मध्ये गुन्ह्याच्या तपासाच्या मानकांना चालना देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री पदक अन्वेषणातील उत्कृष्टतेची स्थापना करण्यात आली. दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी याची घोषणा केली जाते. उत्कृष्ट काम करणा-या पोलिस अधिका-यांना हा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार केंद्रीय तपास यंत्रणा, राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील सदस्यांना त्यांच्या तपासातील उत्कृष्ट सेवेसाठी दिला जातो. त्यासाठी हेडकॉन्स्टेबलपासून ते पोलिस अधीक्षकांपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितले जाते.

वर्ष २०२१ साठी, १५२ पोलीस कर्मचा-यांना केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्ट तपासासाठी प्रदान करण्यात आले. २०२१ मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मर्चा­यांमध्ये सीबीआयचे १५, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी ११, उत्तर प्रदेशचे १०, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिस, कर्मचारी सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या