25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडापश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात विजयी

पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात विजयी

एकमत ऑनलाईन

परभणी : पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडंिमटन स्पर्धेत १९ वर्षाआतील गटात गुजरातने तर खुल्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली.

परभणी येथील बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडंिमटन स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व छत्तीसगढ या पाच राज्यातील स्पर्धेक सहभाग झालेÞ शनिवारी झालेल्या पाचही गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र व गुजरातने विजय मिळविला आहेÞ १९ वर्षाआतील गटात गुजरातच्या अदिता राव हीने महाराष्ट्राच्या हर्षा दुबे हीचा पराभव केलाÞ तर खुल्या गटातील पुरूष एकेरी स्पर्धेत मध्यप्रदेशच्या प्रियंशू राजवत याने मध्यप्रदेशच्याच अलाप मिश्राचा पराभव केलाÞ तर पुरूष दुहेरी मध्ये महाराष्ट्राच्या विपल्व कुवळे व विराज कुवळे यांनी छत्तीसगडच्या एÞव्हीÞ अभिषेक व प्रभिजीत छाबरा यांचा पराभव केलाÞ महिला दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या रितिका ठाकर व सिमरन सिंग यांनी मध्य प्रदेशच्या ऐश्वर्या मेहता व प्रियंका पंत यांचा पराभव केलाÞ तर महिला एकेरीमध्ये गुजरातच्या आदिता राव हीने गुजरातच्याच इशाना तिवारीचा पराभव करीत विजेतेपद पटकाविलाÞ स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून डॉ. सतिश मल्या, स्पर्धा नियंत्रक म्हणून मिहीर रातंजनकर, सहपंच प्रमुख म्हणून सचिन भारती आदी काम पाहात आहेत.

दरम्यान शनिवारी विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आलेÞ यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सुदर्शन मम्मुका, उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार, हेमंतराव जाकर, बाजार समितीचे संचालक गणेशराव घाडगे, इंद्रजीत वरपुडकर आदी उपस्थित होतेÞ सुत्रसंचालक सुनिल मोडक यांनी तर प्रास्ताविक सचिव रंिवद्र देशमुख यांनी केले.

या स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा बॅडंिमटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रंिवद्र पतंगे देशमुख, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, डॉ. शाम जेथलिया, कोषाध्यक्ष सुधीर मांगुळकर, सहसचिव आशिष शाह, सदस्य विजय मुंदडा, विनोद जेठवाणी, नरेंद्र झांजरी, पांडुरंग कोकड, भगवान खैराजानी, उन्मेश गाडेकर, इंद्रजित वरपुडकर, सुनिल देशमुख, विकास जोशी, संकेत सोमवंशी, रुषभ फुरसुले, सतिष सुपेकर, अमोल ओझलवार, जे. डी. सोमाणी,सुनिल कालानी, आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या