28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राने निवडून दिले, आसाममध्ये काय करत आहात?

महाराष्ट्राने निवडून दिले, आसाममध्ये काय करत आहात?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. आसाममध्ये पूर आला आहे. मला वाटलं तिथे मदत करायला आमदार गेले आहेत, परंतु तिथे जाऊन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये रहात असल्याचे म्हणत सुळे यांनी आमदारांवर टीका केली. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आमदारांनी तिथल्या लोकांना जाऊन मदत करावी, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्राने निवडून दिले आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामे कोण करणार? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिलं चालली आहेत, हे योग्य आहे का? असेही त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीबद्दल देखील सुळे यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी इंदापूर आणि बारामतीत काय चाललं आहे हे मी सांगू शकते. बाकीचे काय करतात हे मी कसं सांगू शकते असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या