22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाखुल्या गटात महाराष्ट्र प्रथम

खुल्या गटात महाराष्ट्र प्रथम

एकमत ऑनलाईन

परभणी : पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या अंमित सामन्यातील खुल्या गटात महाराष्ट्राने तर १९ वर्षांआतील गटात छत्तीसगढने बाजी मारली असून महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

परभणी येथील बॅडमिंटन कोर्टवर पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व छत्तीसगढ या पाच राज्यातील स्पर्धेक सहभाग झाले होते. सकाळच्या सत्रात १९ वर्षाआतील गटातील अंतिम सामने महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगढ यांच्यात झाले. या सामन्यात छत्तीसगढने पुरूष एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी या तिन्ही गटात वर्चस्व मिळवत विजेतेपद पटकाविले. तर महाराष्ट्राने महिला एकेरी व पुरूष दुहेरीत यश मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. तर दुपारच्या सत्रात झालेल्या खुल्या गटातील स्पर्धेत पुरूष एकेरी, महिला एकेरी, पुरूष दुहेरी गटात महाराष्ट्राने बाजी मारत विजेतेपद पटकाविला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या