25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले

महाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कामांचा धडाका लावला आहे. तर पूरग्रस्त भागात स्वत: जाऊन मुख्यमंत्री यांनी पाहणी केली.

दरम्यान त्यांच्या याच कामाचे कौतुक करत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले असल्याच म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

तसेच उद्धव ठाकरेंच्या काळातील राहिलेल्या कामांना शिंदे यांनी गती दिली असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने याचा आम्हाला फायदा झाला असून, महाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहे. गेल्या अनेक दिवस आमदारांची जी कामे थकली होती, त्याला न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात जे काही बाकी राहिलं होतं ते पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे.

एकनाथ शिंदे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. शिवसेनेचे अनेक खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढे काय-काय होणार हे पाहत चला. एकनाथ शिंदे हे एक समुद्र असून, छोटे-छोटे नेते या समुद्राला येऊन मिळणार आहे. तसेच १९ किंवा २० तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ज्यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्याला मंत्रिपद मिळणार, असेही सत्तार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या