मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.
भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज २१९० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५६९४८ वर पोहचली आहे. यापैकी १८९७रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १७९१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Read More हिंगोलीत आज पुन्हा तीन रुग्ण कोरोनाबाधित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण १५१७६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४३३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ६४४२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत
राज्यात आज 2190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 56948 अशी झाली आहे. आज नवीन 964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 17918 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 27, 2020